फ्लोरल टॉप आणि मिररवर्क लेहेंगा घालून अवतरली सुंदरा
Photo Credit-Sonalee18588/instagram
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकतीच ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ कार्यक्रमाला हजेरी लावली.
या कार्यक्रमासाठी तिने खास व्हाइट लेहेंगा घातला होता.
फ्लोरल टॉप आणि मिररवर्क लेहेंगा असा तिचा हा लूक आहे.
तिने या लूकमध्ये केस मोकळे सोडले होते आणि बेसिक मेकअप केला होता.
व्हाईट लेहेंग्यामधल्या या फोटोशूटचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.
महाराष्ट्राच्या अप्सरेच्या या फोटोचं खूप कौतुक होतंय.
काहींनी तिला पारंपरिक कपडे घालून फोटोशूट करण्याचा सल्ला दिलाय.