नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अप्सराचा मनमोहक लूक
Photo Credit - sonalee18588/instagram
नवरात्रीच्या निमित्ताने अनेक अभिनेत्री फोटोशूट करत आहेत.
महाराष्ट्राची अप्सरा संबोधलं जाणाऱ्या सोनाली कुलकर्णीनेही नवरात्रीनिमित्त खास फोटोशूट केलं आहे.
पहिल्या दिवशी केशरी ड्रेसमध्ये तिने फोटोशूट केलं.
केशरी रंगाचा घागरा तिने घातला होता. ‘नवरात्रीची पहिली माळ’, असं कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले.
या घागऱ्यासोबत तिने झुमके घातले होते. तसेच केस मोकळे सोडले होते.
हलकासा मेकअप तिने या ड्रेससोबत केला होता.
या लूकमध्ये ती खूप सुंदर दिसत होती.
ऑरेंज ड्रेसमध्ये तिचं सौंदर्य खुलून आलं असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.