सोनाली बेंद्रेचा मराठमोळा साज
photo credit -iamsonalibendre/instagram
अभिनेत्री सोनाली बेंद्रे नेहमी सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असते.
नुकतेच तिने हिरव्या साडीमधले फोटो शेअर केले आहेत.
सिल्व्हर जरी वर्क असलेली तिची ग्रीन साडी आणि वेलवेटचा ब्लाउज हा सोनालीचा ट्रॅडिशनल लूक खूप सुंदर दिसतोय.
सोनालीने नाकात नथही घातली आहे.
साडीसोबत तिने केस मोकळे सोडले आहेत.
वेगवेगळ्या पोज देत तिने हे फोटोशूट केलं आहे.
तिचा हा मराठमोळा साज पाहून चाहते फिदा झाले आहेत.
तिच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.