सोनम कपूरसाठी ‘ही’ व्यक्ती आहे प्रेरणास्थान
अभिनेत्री सोनम कपूर प्रेग्नंसीच्या ब्रेकनंतर सिनेसृष्टीत पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे.
सोनमने गेल्या वर्षी गोंडस मुलाला जन्म दिला. ‘वायू’ असं तिच्या मुलाचं नाव आहे.
आता सिनेसृष्टीत कमबॅक करण्यासाठी तिला एका खास व्यक्तीने प्रेरित केलं आहे.
सोनमला प्रेरणा देणारी व्यक्ती आहे तिचे बाबा अनिल कपूर.
सोनम म्हणते, माझ्या वडिलांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे, ते माझे प्रेरणास्थान आहेत.
सोनम सांगते की,बाबा साधारण पाच दशकं काम करतायत पण आजही ते कामाचा पहिला दिवस असल्यासारखे उत्साही असतात.
ती पुढे सांगते की, माझी इच्छा आहे की मी त्यांच्यासारखं कायम शक्य तितका काळ काम करत राहावं.
सोनमचे दोन मोठे सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
आगामी प्रोजेक्टसाठी सोनम खूप उत्सुक आहे.