24 जून रोजी साऊथ आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सामना पार पडला.
दक्षिण आफ्रिकेने डकवर्थच्या जोरावर वेस्ट इंडिजचा 3 गडी राखून पराभव करून T20 विश्वचषक 2024 च्या उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.
ग्रुप 1 मधील इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत.
अमेरिकेचा 10 गडी राखून पराभव करून उपांत्य फेरी गाठणारा इंग्लंड पहिला संघ ठरला आहे.
भारत सध्या 4 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे जरी ते ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरले तरी त्यांची उपांत्य फेरी गाठण्याची शक्यता जास्त असेल.
टीम इंडियाला पराभूत करूनही कांगारू संघाच्या अडचणी कमी होणार नाहीत कारण त्यांचा निव्वळ धावगती भारतापेक्षा खूपच कमी आहे.
ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश सामन्यावर अवलंबून राहावे लागेल.
अफगाणिस्तान बांग्लादेशवर मोठा विजय नोंदवण्यात यशस्वी ठरला तर राशिद खानची सेना उपांत्य फेरीत प्रवेश करेल.
त्यानंतर T-20 विश्वचषक 2024 ची स्पर्धा शेवटच्या टप्प्यात प्रवेश करेल.