देशात लग्नाचे वेगवेगळे विधी आणि परंपरा आहेत.

अशाच एका अनोख्या परंपरेबद्दल जाणून घेऊया.

लग्नात नवऱ्या मुलाला उलटा लटकवून फटके मारण्यात येतात.

काठीशिवाय चपलांनीसुद्धा काही जण नवऱ्या मुलाला मारतात.

नवऱ्या मुलाच्या तळव्यावरच अशाप्रकारे मारले जाते.

दक्षिण कोरियात ही प्रथा पाळली जाते.

नवऱ्या मुलाची मित्रमंडळी आणि नातेवाईकच हा विधी करतात.

वधू पक्षाकडील कोणीही या विधीत सहभागी होत नाही.

हा विधी पूर्ण केल्यास वैवाहिक आयुष्यात कमी अडचणी येतात असं मानतात.