आरोग्यासाठी उत्तम, चवीला चटकदार मशरूम मंचुरियन

ज्याला मशरूम आवडतात. त्याला हे मंचुरियन नक्कीच आवडेल.

मशरूम मंचुरियन मुलांच्या ताटातही सर्व्ह करता येते. जाणून घ्या रेसिपी

मशरूम स्वच्छ करा आणि धुवा. किचन टॉवेलने चांगले कोरडे करा आणि मध्यम तुकडे करा.

एका भांड्यात मैदा, कॉर्नफ्लोअर, आले-लसूण पेस्ट, 1/2 टीस्पून सोया सॉस, मीठ आणि 4 चमचे पाणी घ्या.

हे सर्व चांगले मिसळा आणि एक मध्यम जाड मिश्रण तयार करा. यात मशरूम घाला.  ते चांगले एकत्र करून घ्या.

तेलात मध्यम आचेवर सोनेरी होईपर्यंत तळून घ्या

एक टेबलस्पून तेलात (आले-लसूण पेस्ट, चिरलेली मिरची आणि चिरलेला कांदा) घाला आणि तडका द्या. 2 मिनिटे मोठ्या आचेवर तळून घ्या.

सोया सॉस, टोमॅटो सॉस, मीठ, तळलेले मशरूमचे तुकडे आणि कांदा घाला. हे मिश्रण एकजीव करून घ्या.

आता हे सर्व एकत्र करा. दोन मिनिटे शिजवा, स्वादिष्ट ड्राय मशरूम मंचुरियन तयार आहे.