उन्हाळ्यात शरीरासाठी दही अतिशय फायदेशीर आहे. जाणून घ्या काय फायदे होतात दह्याने. 

 दह्यापासून रायता, लस्सी, ताक, कढी अशा अनेक रेसिपी बनवता येतात. दह्यात good bactaria वाढवण्याची ताकद आहे.

दह्यात आवश्यक पोषक घटक असतात, जे उन्हाळ्यात खूप फायदेशीर असतात. उन्हाळ्यात दही वरदानापेक्षा कमी नाही.

दह्यामुळे त्वरित ऊर्जा मिळते आणि शरीरातील सर्व थकवाही काही मिनिटांतच निघून जातो. दही हे प्रथिने, जीवनसत्त्वे, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि फॉलिक ऍसिडचा चांगला स्रोत मानले जाते. 

उन्हाळ्यात दही त्वचा चमकदार आणि तुकतुकीत ठेवण्यास खूप मदत करते.

दही हे कॅल्शियम समृद्ध प्रो-बायोटिक आहे. दह्यातल्या कॅल्शियममुळे दात आणि हाडे मजबूत होतात.

दही तुमची चरबी जाळण्याचे काम करते पर्यायाने वजन कमी होते, आणि त्यात प्रोबायोटिक्स असते, जे  पचनसंस्था सुधारते.

दह्यामध्ये असलेले चांगले बॅक्टेरिया रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. दह्यामुळे माणसाचे शरीर सर्व पोषक तत्वे शोषून घेण्यास सक्षम होते.

दह्याचे नियमित सेवन केल्याने पचनक्रिया सुरळीत राहते. एका संशोधनानुसार, दह्याच्या सेवनाने तुमच्या पोटात कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होत नाही. शरीर हायड्रेटेडसुद्धा राहते.