महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात 7 ते 8 जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. उष्माघात म्हणजे काय? काय आहेत उष्माघाताची कारणं.

या कार्यक्रमाला लाखो अनुयायी उपस्थित होते. त्यावेळी पुरेसं पाणी न प्यायल्याने अनेकांना उष्माघाताचा झटका आला.

उष्माघात म्हणजे ऊन लागणे, जेव्हा शरीर तापमान नियंत्रित करू शकत नाही तेव्हा उष्माघाताचा त्रास होतो.

उष्माघात होतो त्यावेळी शरीराचे तापमान वेगाने वाढते आणि ते कमी करता येत नाही. 

उष्माघाताचा झटका येतो त्यावेळी त्या व्यक्तीला अजिबात घाम येत नाही. शरीरातील घाम येण्याची यंत्रणा बिघडते.

एकदा का उष्माघाताचा झटका आला की 10 ते 15 मिनिटांमध्ये शरीराचे तापमान 106 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक वाढते.