17 नोव्हेंबरला सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे.
सूर्याचे हे संक्रमण अतिशय विशेष मानले जाते. कारण या दिवशी सूर्य आणि बुध यांचा संयोगही होणार आहे.
6 नोव्हेंबरला बुधाचे गोचर वृश्चिक राशीत झाले आहे, त्यामुळे आता बुधादित्य योग तयार होणार आहे.
या बुधादित्य योगामुळे कोणत्या राशींना फायदा होणार जाणून घ्या.
मिथुन - शुभ दिवसांची सुरुवात होईल. शत्रूंवर वर्चस्व राहील.
नव्या कामाची सुरुवात करू शकता. वैवाहिक जीवन चांगले राहील
कर्क - विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला जाणार आहे. कुटुंबातील वातावरण चांगले राहील.
कन्या- मान-सन्मानात वाढ होण्याची शक्यता आहे. प्रलंबित कामेही लवकर पूर्ण होतील.
कुंभ - आर्थिकदृष्ट्या हा काळ अतिशय शुभ मानला जातो. उत्पन्न आणि खर्चाचा समतोल राखण्यात यश मिळेल.