अभिनेत्री स्वानंदी टिकेकरचा आशिष कुलकर्णीसोबत नुकताच साखरपुडा झाला.

साखरपुड्याच्या दोन दिवस आधीच स्वानंदीने ‘आमचं ठरलंय’ अशी घोषणा केली होती.

साखरपुड्यासाठीच्या मेहंदीचे फोटोही स्वानंदीने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.

साखरपुड्यासाठी खास फुलांचं डेकोरेशन करण्यात आलं होतं.

साखरपुड्यासाठी स्वानंदीने पेस्टल पिस्ता रंगाची साडी नेसली होती. आशिषने त्याच रंगाचं जॅकेट घातलं होतं.

स्वानंदीने ‘And We’re Engaged!’ असं कॅप्शन  देत साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंसाठी #SwanandiAshish असा हॅशटॅग वापरण्यात आलाय.

अभिनेत्री स्वानंदी टिकेकरचा होणारा नवरा आशिष हा गायक आहे. इंडियन आयडॉलमुळे त्याला अधिक प्रसिद्धी मिळाली.

साखरपुड्याचे फोटो शेअर केल्यानंतर दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होतो.

फोटो सौजन्य - स्वानंदी टिकेकर/ इन्स्टाग्राम