अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णी हे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.
काही महिन्यांपूर्वीच त्यांचा साखरपुडा झाला होता. आता त्यांच्या लग्नाची लगबग सुरु झाली आहे.
स्वानंदी आणि आशिषचं नुकतंच केळवण पार पडलं.
या केळवणाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहेत.
स्वानंदीनं हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ''द काऊंट डाऊन बिगिंन्स, हे सर्व तुमच्या सर्वांपासून सुरू झाले आहे. सुकन्या मोने आम्हाला #anandi हा खास हॅशटॅग दिल्याबद्दल धन्यवाद".
स्वानंदी ही अभिनेता उदय टिकेकर आणि गायिका आरती अंकलीकर यांची मुलगी आहे. स्वानंदीनं अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.
आशिष कुलकर्णी हा गायक आणि गीतकार आहे. आशिषला इंडियन आयडॉल 12 या शोमुळे विशेष लोकप्रियता मिळाली.
साखरपुड्यानंतर आता स्वानंदी आणि आशिषच्या लग्नाच्या दिवसाची सगळे जण आतुरतेने वाट बघत आहेत.