स्वरा भास्करने लेकीचं ठेवलंय ‘हे’ नाव, अर्थ जाणून घ्या

Photo credit -reallyswara/instagram

अभिनेत्री स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे.

स्वराने 23 सप्टेंबर रोजी गोंडस मुलीला जन्म दिला. 

नुकतेच तिने  फहाद आणि मुलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत मुलीच्या नावाची घोषणा केली आहे.

स्वराने तिच्या मुलीचं नाव ‘राबिया’ ठेवलं आहे.

सुफी संत राबिया बसरी यांच्या नावावरून स्वरा आणि फहादने मुलीचं नाव ‘राबिया’ असं ठेवलं आहे. 

राबिया या नावाचा अर्थ वसंत ऋतू किंवा राणी असा होतो.

‘एक प्रार्थना सुनी गई, एक आशीर्वाद दिया गया, एक गीत फुसफुसाया गया, एक रहस्यमय सत्य’, असं कॅप्शन देत तिने हॉस्पिटलमधले फोटो शेअर केले.

स्वरा आणि फहादने आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आभार मानले आहेत.