गणपती विसर्जनासाठी कार घेऊन जाणार? रस्त्यावर निघण्याआधी या 7 गोष्टी नक्की तपासा!

Automobile

07 Sep 2026

Author: प्रज्ञा घोगळे - निकम

रस्त्यावर निघण्याआधी या ७ गोष्टी नक्की तपासा!

विसर्जनासाठी कार घेऊन जाणार? 

Picture Credit: pinterest

विसर्जनाच्या गर्दीत लांब प्रवास होणार असेल तर टायर प्रेशर आणि स्पेअर व्हीलची स्थिती आधी तपासा.

टायर तपासा

Picture Credit: pinterest

ब्रेक पेडल, ब्रेक फ्लुइड आणि ब्रेकचा प्रतिसाद व्यवस्थित आहे का, हे पाहा.

ब्रेकची तपासणी

Picture Credit: pinterest

ट्रॅफिकमध्ये कार बराच वेळ सुरू राहू शकते. त्यामुळे इंजिन ऑइल आणि कूलंटची पातळी तपासा.

इंजिन ऑइल

Picture Credit: pinterest

हेडलाइट, टेललाइट, इंडिकेटर आणि हॉर्न व्यवस्थित काम करत आहेत का, हे निघण्यापूर्वी पाहा.

बॅटरी आणि लाईट्स

Picture Credit: pinterest

जास्त प्रवासी किंवा सामानामुळे कारच्या ब्रेकिंग आणि नियंत्रणावर परिणाम होऊ शकतो.

कार ओव्हरलोड करू नका

Picture Credit: pinterest

फर्स्ट-एड किट, टॉर्च, पंक्चर रिपेअर किट, टिश्यू आणि आवश्यक कागदपत्रे कारमध्ये ठेवा.

या वस्तू जवळ ठेवा 

Picture Credit: pinterest

गर्दीच्या ठिकाणी कार रस्त्याच्या कडेला किंवा नो-पार्किंग झोनमध्ये उभी करू नका. अधिकृत पार्किंगचा वापर करा.

विसर्जनस्थळी कार कुठे पार्क करणार?

Picture Credit: pinterest

टायर • ब्रेक • ऑइल • कूलंट • लाईट्स हे सर्व तपासा आणि मगच बाप्पांच्या विसर्जनासाठी सुरक्षित प्रवासाला निघा!

निघण्याआधी 5 मिनिटांची चेकलिस्ट!

Picture Credit: pinterest