बॅकलेस शिमरी गाऊनमध्ये तमन्ना भाटियाचा सिझलिंग लूक
अभिनेत्री तमन्ना भाटिया अनेकांची आवडती अभिनेत्री आहे.
तमन्ना तिचे वेगवेगळ्या लूकमधले फोटो नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते.
तमन्नाने ‘जीक्यू’ पुरस्कार सोहळ्यासाठी घातलेल्या ड्रेसमध्ये फोटोशूट केलं. हे फोटो तिने शेअर केले आहेत.
तिने जांभळ्या रंगाचा बॅकलेस शिमरी गाऊन घालून हे फोटोशूट केलंय.
या ड्रेससोबत तिने जांभळ्या रंगाचे हिल्सचे सँडल्स घातले आहेत.
क्रॉस पेंडंट असलेलं नेकलेस आणि डायमंडचं नेकलेस याचं कॉम्बिनेशन करून तिने गळ्यात घातलं आहे.
वेगवेगळ्या पोज देत तिने हे फोटोशूट केलंय.
तमन्नाचा हा सिझलिंग लूक अनेकांना आवडला आहे. तिच्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.