अभिनेत्री तमन्ना भाटियाची ‘जी करदा’ ही वेबसीरिज नुकतीच रिलीज झाली आहे.
या वेबसीरिजमध्ये सात मित्र-मैत्रिणींची कथा मांडण्यात आली आहे.
या वेबसीरिजची सध्या खूप चर्चा सुरु आहे.
तमन्ना भाटिया ‘जी करदा’ वेबसीरिजमुळे ट्रोल झाली आहे.
कारण या वेबसीरिजमध्ये तमन्नाचा इंटिमेट सीन दाखवण्यात आला आहे.
करिअर वाचवण्यासाठी तमन्ना बोल्ड सीन करत असल्याचा आरोप होतोय.
दुसरीकडे काही चाहत्यांनी मात्र तमन्ना तिच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर आल्याबद्दल तिचं कौतुक केलं आहे.
‘जी करदा’ नंतर तमन्ना ‘लस्ट स्टोरीज’मध्येही बोल्ड अवतारात दिसण्याची शक्यता आहे.
आगामी काळात मल्याळम फिल्म ‘बांद्रा’,तेलुगु फिल्म ‘भोला शंकर’ आणि तमिळ फिल्म ‘जेलर’ मध्ये तमन्ना झळकणार आहे.