कोणती इलेक्ट्रिक SUV खरेदी करावी? Nexon EV की XUV 3XO EV?

Automobile

20 Nov 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Tata Nexon EV ची एक्स-शोरूम किंमत 12.49 लाख रुपयांपासून सुरू होते. तर Mahindra XUV 3XO EV ची सुरुवातीची किंमत 13.89 लाख रुपये आहे. बजेटच्या बाबतीत टाटा आघाडीवर आहे.

किंमत कोणाची कमी?

Picture Credit:tata

Nexon EV मध्ये 30kWh आणि 45kWh असे दोन बॅटरी पर्याय मिळतात. XUV 3XO EV मध्ये 39.4kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देण्यात आला आहे.

बॅटरी पॅकमध्ये कोण पुढे?

Picture Credit:mahindra

Nexon EV ची दावा केलेली रेंज 275 ते 489 किमी आहे. तर XUV 3XO EV ची MIDC प्रमाणित रेंज 351 किमी आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी Nexon EV चा 45kWh पर्याय फायदेशीर ठरू शकतो.

एका चार्जमध्ये किती धावणार?

Picture Credit:tata

XUV 3XO EV मध्ये 150hp पॉवर आणि 310Nm टॉर्क मिळतो. तर Nexon EV 45kWh मध्ये 145hp पॉवर आणि 215Nm टॉर्क मिळतो. त्यामुळे टॉर्कच्या बाबतीत महिंद्राची SUV पुढे आहे.

पॉवर आणि टॉर्कची तुलना

Picture Credit:mahindra

Nexon EV मध्ये मोठी टचस्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, व्हेंटिलेटेड सीट्स आणि निवडक व्हेरिएंटमध्ये ADAS मिळते. तर XUV 3XO EV मध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल आणि 360-डिग्री कॅमेरा मिळतो.

फीचर्समध्ये कोण सरस?

Picture Credit:tata

Nexon EV ला Bharat NCAP कडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. XUV 3XO EV मध्ये 6 एअरबॅग्ज, 360-डिग्री कॅमेरा आणि टॉप व्हेरिएंटमध्ये ADAS फीचर्स देण्यात आले आहेत.

सेफ्टीमध्ये कोण पुढे?

Picture Credit:mahindra

Nexon EV 45kWh ला 60kW DC फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. XUV 3XO EV मध्ये 50kW DC चार्जिंगचा सपोर्ट मिळतो. बूट स्पेसमध्येही महिंद्रा 364 लिटर क्षमतेसह टाटाच्या 350 लिटरपेक्षा पुढे आहे.

चार्जिंग आणि स्पेस

Picture Credit:tata

जास्त रेंज, कमी सुरुवातीची किंमत आणि 5-स्टार सेफ्टी रेटिंग हवे असल्यास Tata Nexon EV चांगला पर्याय आहे. तर दमदार टॉर्क, मोठा बूट आणि प्रीमियम फीचर्सना प्राधान्य असल्यास Mahindra XUV 3XO EV निवडू शकता.

कोणती SUV खरेदी करावी?

Picture Credit:mahindra