टाटा सफारी डार्क एडिशनचा नवा लूक आणि भन्नाट फिचर्स

टाटा मोटर्सने सफारी SUV चं फेसलिफ्ट मॉडेल नुकतंच लाँच केलं आहे.

नवीन सफारी फेसलिफ्ट प्रमाणे, याचं डार्क एडिशनही  एलईडी लाइटिंग आणि नवीन फ्रंट डिझाईनच्या बदलांसह लाँच केलं आहे.

नवीन सफारी फेसलिफ्ट डार्क एडिशनमध्ये मोठ्या अलॉय व्हील्ससह 19 इंचाची चाकं आहेत. कार संपूर्ण काळ्या रंगातच उपलब्ध आहे.

कनेक्टेड LED लाइटिंगसह स्टायलिंगही नवीन आहे.

 या गाडीत नवीन 12.3 इंच टचस्क्रीन आणि 10.25 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे.

फ्रंट पार्किंग सेन्सर्ससह 360 डिग्री कॅमेरा, नवीन स्टॉप आणि गो ॲडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोलसह 11 फिचर्ससह ADAS सूट यात आहे. तसेच 13 मोडसह 10 स्पीकर JBL ऑडिओ सिस्टीमचा समावेश आहे.

या गाडीमध्ये मूड लाइटिंगसह व्हॉइस असिस्टेड पॅनोरमिक सनरूफ आणि नवीन डिजिटल फोर स्पोक स्टीअरिंग व्हील देखील आहे.

या गाडीत 6 सीटर फॉर्म,7 एअरबॅग आणि गिअर शिफ्टर आहे. यात मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक इंजिनसह 2 लिटर डिझेल युनिट आहे.