चहा आणि कॉफीचं व्यसन ड्रग्जप्रमाणे असतं.
चहा पिण्याची सवय असणाऱ्या व्यक्तींची तल्लफ भागली नाही, तर त्या व्यक्ती चिडचिड्या होतात.
रोज एक कप चहा औषधापेक्षा कमी नसल्याचं संशोधनातून स्पष्ट झालं आहे.
चहामुळे तणाव कमी होतो,आजारांशी लढण्यास सक्षम बनवतो चहा असा दावा
चहामधील पानांच्या अँटीऑक्सिडंट्समुळे रक्त स्वच्छ होतं, सूज कमी होते.
चहा पिणाऱ्या व्यक्ती दीर्घ काळ आणि निरोगी आयुष्य जगतात.
ज्या व्यक्ती दिवसभरात एक ते पाच कप चहा पितात त्यांना डिमेन्शिया अर्थात स्मृतिभ्रंशाचा धोका कमी असतो.
एक कप चहा प्यायल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.
एक कप चहा माणसाला अनेक प्रकारे निरोगी राहण्यास मदत करतो, असं अमेरिकेतल्या बोस्टनमधल्या टफ्ट्स युनिव्हर्सिटीचे डॉ. जेफ्री ब्लूमबर्ग यांनी सांगितलं.