गोकुळाष्टमीनिमित्त मोरपिसावर रेखाटले श्रीकृष्णाचे चित्र

गोकुळाष्टमीच्या सणाचा सध्या सगळीकडे उत्साह दिसतोय.

दहिहंडीसाठी किती थरांची सलामी लावायची याचं प्लॅनिंग करण्यात गोविंदा पथकं व्यस्त आहेत.

मात्र वसईतल्या कलाशिक्षकाने गोकुळाष्टमीनिमित्त एक खास गोष्ट केली आहे.

वसईतील न्यू इंग्लिश स्कूलमधील कलाशिक्षक कौशिक जाधव यांनी मोरपिसावर श्रीकृष्णाचं चित्र रेखाटलं आहे.

कृष्णाला मोरपीस आवडतं,अशी मान्यता आहे. त्यामुळे कौशिक यांनी मोरपिसावरच भगवान श्रीकृष्णाचे चित्र रेखाटलं आहे.

एका तासात हे चित्र तयार करण्यात आलं आहे.

रंगांच्या सुंदर छटा या चित्रात दिसतायत.

या चित्राचं सगळेजण कौतुक करतायत.