अभिनेत्री तेजश्री प्रधान टेलिव्हिजनवर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे.

दोन वर्षांनंतर ती छोट्या पडद्यावर पुन्हा दिसणार आहे.

स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेतून तेजश्री प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

मात्र ती नक्की कोणती भूमिका साकारणार आहे हे अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही.

नव्या भूमिकेसाठी तेजश्री खूप उत्सुक आहे.

तेजश्री म्हणाली, मी एक प्रोजेक्ट संपल्यानंतर काही काळ दिसणं टाळते.

 त्यामुळे प्रेक्षक माझ्या नव्या भूमिकेची कायम वाट बघत असतात.

आता प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे.

तेजश्री लवकरच  नव्या मालिकेत झळकणार असल्याने तिचे चाहते नक्कीच आनंद साजरा करतील.