अभिनेत्री तेजस्विनी लोणारीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

 ग्लॅमरस लूकमध्ये दिसणारी तेजस्विनी बेधडक पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

 ‘अफलातून’ या मराठी चित्रपटामध्ये ती पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

आलिया सावंत  असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे.

‘अफलातून’मधल्या भूमिकेसाठी तेजस्विनीला गोव्याच्या भाषेचा थोडा अभ्यास करावा लागला.

गोव्याची भाषा  शिकताना मजा आल्याचं तेजस्विनीने सांगितलं.

 ‘अफलातून’ हा विनोदी चित्रपट आहे.

चित्रपटामध्ये जॉनी लिव्हर, विजय पाटकर, भरत दाभोळकर, जेसी लिव्हर, सिद्धार्थ जाधव असे अनेक कलाकार आहेत.

येत्या 21 जुलैला हा चित्रपट रिलीज होणार आहे.