ही SUV म्हणजे BYD च्या Fang Cheng Bao ब्रँडची Ti 9. चीनमध्ये 19 नोव्हेंबर 2026 रोजी ही SUV लॉन्च झाली. तिच्या टॉप व्हेरिएंटमध्ये Foldable Smart Cabin हे खास फीचर देण्यात आले आहे.
Picture Credit:BYD
या SUV मध्ये स्टिअरिंग व्हील 180 अंशांपर्यंत फिरून डॅशबोर्डमधील खास कप्प्यात जाते. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी साधारण 10 सेकंद लागतात.
Picture Credit:BYD
यासाठी इलेक्ट्रिक मोटर्स आणि विशेष हिंग्जचा वापर केला आहे. रोबोटिक्समध्ये वापरल्या जाणाऱ्या मोटर तंत्रज्ञानाची मदत घेऊन ही यंत्रणा विकसित करण्यात आली आहे.
Picture Credit:BYD
या फीचरमागे Steer-by-Wire तंत्रज्ञान आहे. यात स्टिअरिंग व्हील आणि चाकांमध्ये पारंपरिक मेकॅनिकल कनेक्शनऐवजी इलेक्ट्रॉनिक सिग्नलद्वारे नियंत्रण केले जाते. त्यामुळे स्टिअरिंगची जागा बदलणे शक्य होते.
Picture Credit:BYD
स्टिअरिंग फोल्ड झाल्यानंतर चालकासमोरील जागा मोकळी होते. या जागेत टेबलसारखी ट्रे बाहेर येते. त्यामुळे पार्किंगमध्ये बसून काम करणे, खाणे किंवा आराम करणे शक्य होते.
Picture Credit:BYD
स्टिअरिंग फोल्ड होताना हात किंवा वस्तू अडकू नयेत यासाठी अँटी-पिंच प्रोटेक्शन दिले आहे. या यंत्रणेची क्षमता 80 हजार ऑपरेटिंग सायकल्सपर्यंत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
Picture Credit:BYD
नाही! हे सर्वात महत्त्वाचे आहे. गाडी चालू असताना स्टिअरिंग फोल्ड करता येत नाही. वाहन पूर्णपणे थांबलेले असतानाच हे फीचर वापरता येते. त्यामुळे ऑटोनॉमस ड्रायव्हिंगमध्ये स्टिअरिंग गायब होते, असा गैरसमज करून घेऊ नका.
Picture Credit:BYD
BYD Ti 9 ची चीनमधील किंमत 2,79,900 युआनपासून सुरू होते. तर Folding Smart Cabin असलेल्या टॉप व्हेरिएंटची किंमत 3,29,900 युआन आहे. या SUV मध्ये 1.5-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि दोन इलेक्ट्रिक मोटर्सचे हायब्रिड सेटअपही मिळते.
Picture Credit:BYD