Published Sept 12, 2024
By Harshada Patole
Pic Credit - social media
पृथ्वीच्या दिशेने सरकणाऱ्या महाविनाशकारी Asteroid अपोफिसचा पृथ्वीला काय धोका?
दीर्घकाळापासून लघुग्रहांना पृथ्वीसाठी धोका मानले जात आहे. एखादा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर मोठा विध्वंस होऊ शकतो.
एखादे मोठे लघुग्रह पृथ्वीवर आदळल्यास मानवता नष्ट होईल, असे इस्रोचे प्रमुख डॉ.सोमनाथ यांनी एका मुलाखतीत सांगितले.
.
सध्या इस्रो या लघुग्रहावर सतत लक्ष ठेवून आहे. त्याच्या ट्रॅकिंगसाठी नेटवर्क फॉर स्पेस ऑब्जेक्ट्स ट्रॅकिंग अँड ॲनालिसिस (NETRA) प्रकल्प सुरू आहे.
पृथ्वीला धोका असलेल्या धोकादायक महाविनाशकारी Asteroidचे नाव अपोफिस आहे.
या लघुग्रहाचा आकार तीन फुटबॉल स्टेडियमएवढा आहे.
अपोफिस नावाचा हा लघुग्रह 1230 फूट रुंद आहे. पाच वर्षांनंतर 13 एप्रिल 2029 रोजी ते पृथ्वीपासून अवघ्या 32 हजार किलोमीटर अंतरावरुन जाईल.
हा लघुग्रह पृथ्वीवर आदळल्यास संपूर्ण आशिया नष्ट होऊ शकतो, असा अंदाज इस्रोने व्यक्त केला आहे.
हा लघुग्रह सुरक्षित कक्षेत फिरत होता, पण अचानक पृथ्वीच्या दिशेने वळला.
सूर्याच्या उष्णतेमुळे अवकाशात फिरणाऱ्या दगडाला त्याच्या मार्गात थोडासा बदल झाला तर त्याला यार्कोव्स्की इफेक्ट म्हणतात.
यार्कोव्स्की इफेक्टच्या प्रभावाखाली लघुग्रहाची दिशा आणि वेग बदलतो. अंतराळातील त्या लघुग्रहाकडे वेगाने येणाऱ्या वस्तूंसाठी हे धोकादायक आहे.