आज २० मार्च ‘जागतिक चिमणी दिवस’ जगभरात चिमणी संवर्धनासाठी जागर करणारा आजचा दिवस.

पहिला जागतिक चिमणी दिन २०१० मध्ये जगाच्या विविध भागात साजरा करण्यात आला.

शहरात चिमणी शोधावी लागते. पुढे मुलांना फोटोतच चिमण्या दाखवाव्या लागतील की काय, अशी चिंताजनक परिस्थिती निर्माण होताना दिसते आहे.

आता चकचकीत घरांमध्ये, स्लाईडिंगच्या खिडक्यांमधून चिमणीला घरात येण्यासाठी रस्ता हरवला आहे.

मोबाईल टॉवर्सचे रेडिएशन्स, हानिकारक किरणे यामुळेही कित्येक चिमण्यांचा मृत्यू झाला आहे.

आता बागेतील गायब होणाऱ्या चिमण्या आधी वाचवायच्या असतील तर आजच्या जागतिक चिमणी दिनाच्या दिवशी चिमणी वाचवू अभियान राबवू या असे आवाहन पक्षीप्रेमींनी केले आहे.