रावेर तालुक्यात भर दुपारी झालेल्या वादळी पावसामुळे अनेक कुटुंबाच्या घरांची पडझड 

रावेर तालुक्यात दुपारी झालेल्या वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. लालमाती येथे अनेक कुटुंबाच्या घरांची पडझड झाल्याने अनेक गरीब कुटुंबे रस्त्यावर आली आहेत.

केळीच्या बागांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी विद्युत तारा खांबासहीत तुटून पडल्या आहेत.

घटनेची माहिती मिळताच तहसीलदार बंडू कापसे यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

रावेर शहरासह आदिवासी पट्यात आज दुपारी वादळी पासवाने मोठे नुकसान झाले आहे.रावेर शहरात कैकाडीवाडा येथे लिंबाचे झाड कोसळुन तीन मोटर सायकलचे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती कॉग्रेस शहराध्यक्ष संतोष पाटील यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली. 

तहसीलदार बंडू कापसे यांच्याशी बोलून पंचनामे करण्यासाठी विनंती केली. 

लालमाती (ता रावेर) येथे देखील घरांची मोठी पडझड झाली असून अनेक घरे कोसळली आहेत. 

विद्युत तारा तुटून पडल्या असून खांब देखील पडले आहेत.