'द कपिल शर्मा शो'त्याचे शेवटचे भाग प्रसारित करत आहे. काही दिवसांमध्येच हा शो ऑफएअर होईल

दरम्यान, कपिल शर्माची ऑनस्क्रीन पत्नी सुमोना चक्रवर्तीने एक पोस्ट शेअर केली आहे.

 सुमोना म्हणते, "जे प्रामाणिकपणे नाते निर्माण करतात, त्यांना त्या बदल्यात नात्यातही खरेपणा मिळतो."

यासोबतच सुमोनाने स्वतःचे काही फोटोही शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती साडी नेसलेली दिसत आहे.

सुमोनाने असेही सांगितले आहे की तिने शेवटच्या एपिसोडमध्ये गोल्डन-ब्लू रंगाची साडी नेसली होती.

सुमोना साडीमध्ये सुंदर दिसते, तिचं सौंदर्य खुलून येतं. 

काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने तिचा वाढदिवस साजरा केला होता. यादरम्यान एक पोस्टही शेअर करण्यात आली.

या पोस्टद्वारे सुमोनाने अशा लोकांची माफी मागितली होती ज्यांना तिने नकळत दुखावले आहे.