'द केरला स्टोरी' सिनेमा रिलीजच्या आधीपासूनच वादात सापडलेला आहे.
अदा शर्माची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा सत्य घटनांवर आधारित असल्याचं
म्हटलं जात आहे.
काही राज्यांनी या सिनेमावर बंदी घातली आहे, तर काहींनी हा सिनेमा टॅक्स फ्री केला आहे.
पश्चिम बंगालमध्ये सिनेमावर बंदी घालण्यात आलेली आहे.
बंगालप्रमाणेच तामिळनाडूमध्येही 'द केरला स्टोरी' सिनेमा बॅन करण्यात आला आहे.
योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये हा सिनेमा टॅक्स फ्री केला आहे.
मध्य प्रदेशमध्येही सिनेमा टॅक्स फ्री म्हणून घोषित करण्यात आला आहे.
उत्तराखंडमध्येही 'द केरला स्टोरी' टॅक्स फ्री करण्यात आला आहे.