आता स्मार्टफोनच बनणार कारची चावी! UWB Technology कसे करते काम?

Automobile

17 Nov 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

UWB Technology म्हणजे काय?

UWB म्हणजेच Ultra-Wideband Technology. हे एक वायरलेस कम्युनिकेशन तंत्रज्ञान आहे. याच्या मदतीने दोन डिव्हाइसमधील अंतर आणि लोकेशन अचूकपणे ओळखता येते.

Picture Credit: pinterest

स्मार्टफोन बनतो कारची चावी!

UWB सपोर्ट असलेला स्मार्टफोन डिजिटल कार की म्हणून काम करू शकतो. यासाठी फोन आणि कारच्या सिस्टीममध्ये सुरक्षित कनेक्शन तयार केले जाते.

Picture Credit: pinterest

कारजवळ जाताच ओळख पटते!

कारमध्ये बसवलेले UWB सेन्सर्स स्मार्टफोनचा सिग्नल ओळखतात. फोन कारपासून किती अंतरावर आहे आणि कोणत्या दिशेला आहे, याची माहिती मिळते.

Picture Credit: pinterest

लॉक आपोआप कसे उघडते?

अधिकृत स्मार्टफोन कारच्या जवळ आल्याचे सिस्टमला समजताच त्याची ओळख पडताळली जाते. सर्व माहिती योग्य असल्यास कारचे दरवाजे अनलॉक होतात.

Picture Credit: pinterest

Bluetooth पेक्षा वेगळे कसे?

Bluetooth च्या तुलनेत UWB अंतर मोजण्यासाठी अधिक अचूक ठरते. त्यामुळे फोन कारच्या अगदी जवळ आहे की काही अंतरावर, हे सिस्टमला समजण्यास मदत होते.

Picture Credit: pinterest

सुरक्षेचा अतिरिक्त स्तर!

UWB तंत्रज्ञानामध्ये सुरक्षित अंतर मोजण्याची पद्धत वापरली जाते. त्यामुळे सिग्नल दुसरीकडे पाठवून कार अनलॉक करण्याच्या Relay Attack चा धोका कमी करण्यास मदत होते.

Picture Credit: pinterest

कोणत्या कारमध्ये मिळते हे फीचर?

काही प्रीमियम कारमध्ये UWB आधारित Digital Key सुविधा उपलब्ध आहे. BMW, Genesis आणि काही इतर वाहन उत्पादकांनी या तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. मात्र, सपोर्ट कारच्या मॉडेल आणि स्मार्टफोनवर अवलंबून असतो.

Picture Credit: pinterest

भविष्यात चावीची गरजच नाही?

UWB मुळे कार अनलॉक करणे, लॉक करणे आणि काही मॉडेलमध्ये इंजिन सुरू करणेही सोपे होऊ शकते. भविष्यात स्मार्टफोनच कारची स्मार्ट चावी बनण्याची शक्यता आहे.

Picture Credit: pinterest