ती मुघल राजकन्या जिच्या सौंदर्यावर भाळला होता म्हातारा सम्राट
मी जीव देईन पण म्हातार्या राजाशी लग्न करणार नाही
हजरत बेगम यांचा जन्म मुघल राजकुमारी म्हणून झाला होता. ती मुघल सम्राट मुहम्मद शाह आणि साहिबा महल यांची मुलगी होती
एप्रिल १७४८ मध्ये मुहम्मद शाह यांचे निधन झाले. हजरतचा भाऊ अहमद शाह बहादूर याने मुघल बादशहाचा कारभार हाती घेतला.
त्यावेळी मुघल साम्राज्याचे विघटन होत होते. 1754 मध्ये मराठ्यांनी हल्ला केला. बादशहाने हजरत महल, तिची आई, मुलगा आणि आवडत्या पत्नीला सोबत घेऊन पळ काढला.
राजकुमारी हजरत महल खूप सुंदर होती. इतकी की तिच्या सौंदर्याची चर्चा संपूर्ण साम्राज्यात होऊ लागली होती.
इमाद-उल-मलिकच्या मदतीने आता सुमारे 60 वर्षांचा आलमगीर मुघल सम्राट बनला होता. त्याच्या कानावरही ही बातमी पोहोचली.
तेव्हा सम्राट ६० वर्षांचा होता. तो राजकन्येच्या सौंदर्यावर इतका मोहित झाला होता की त्याने तिला मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.
साहिबा महल आणि राजकन्येची सावत्र आई बादशाह बेगम यांच्यावर खूप दबाव आणला गेला. राजकुमारीने स्पष्टपणे सांगितले की ती मृत्यू स्वीकारेल परंतु 60 वर्षांच्या म्हाताऱ्याशी लग्न करणार नाही.
एप्रिल 1757 मध्ये अहमदशहा अब्दालीने दिल्ली लुटली. त्याने राजकन्येला लग्नाचा प्रस्ताव ठेवला. बादशाह बेगम याच्या विरोधात होत्या पण शाहने 5 एप्रिल 1757 रोजी राजकन्येशी जबरदस्तीने लग्न केले.
अहमदशहा अब्दाली निकाहनंतर हजरत महलला अफगाणिस्तानात घेऊन गेला. बादशाह बेगमसोबत साहिबा महलही गेल्या.