सामुद्रिक शास्त्रानुसार, एखादी व्यक्ती ज्या प्रकारे मूठ आवळते त्यावरून त्या व्यक्तीच्या स्वभावाबद्दल सांगता येते.
जर एखादी व्यक्ती मूठ आवळताना अंगठा आत आणि सर्व बोटे बाहेर ठेवत असेल तर ती खूप सर्जनशील आहे.
अशी व्यक्ती हुशार तर असतेच शिवाय आपली कामे चांगल्या प्रकारे पूर्ण करतात.
मूठ आवळताना जर तुम्ही अंगठा तर्जनी वर ठेवला तर याचा अर्थ तुमच्यात जन्मापासूनच लिडरशीपचे गुण आहेत.
तसेच तुम्ही शूर आहात. तरीही एखादे काम करताना तुम्ही नर्व्हस होता, मात्र शेवटी काम पूर्ण करताच.
तुमच्या या गुणवत्तेमुळे तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण करता.
जर तुम्ही सर्व बोटांनी घट्ट मूठ आवळली तर ती व्यक्ती सर्जनशील असते.
तुमचे व्यक्तिमत्व खूपच आकर्षक आहे. असे लोक खूप प्रामाणिक आणि समजूतदार असतात.
तेव्हा तुम्ही मूठ कशाप्रकारे आवळता यावरून तुमचं व्यक्तीमत्त्व ठरू शकतं.