चुकीच्या मेकअपमुळे  तुम्ही वयाने मोठे दिसू शकता

मेकअपच्या  चुका टाळण्यासाठी पुढील  टिप्स फॉलो करा

प्रत्येक मुलीला मेकअप करायला आवडते. मात्र, अनेक वेळा महिला मेकअपच्या अशा काही चुका करतात, ज्यामुळे त्या मोठ्या दिसू लागतात.

महिलांनी आता आपल्या मेकअप रूटीनमध्ये काही सवयी बदलण्याची वेळ आली आहे. कारण जसजसे वय वाढते तसतसे त्वचेचे वयही वाढते. 

भुवया  : थ्रेडिंगमुळे आपल्या भुवया बर्‍याच प्रमाणात पातळ होतात. वाढत्या वयानुसार, ते कमी दाट दिसू लागतात. अशा परिस्थितीत  नेहमी तुमच्या भुवयांच्या रंगापेक्षा हलकी शेड निवडा 

लिपस्टिक : लिपस्टिकच्या गडद रंगांमुळे तुमचे ओठ खूप पातळ दिसू लागतात. त्याऐवजी, न्यूड रंग वापरा. त्यामुळे तुम्ही  तरुण दिसू लागता

ब्लश :  चुकीच्या पद्धतीने ब्लश लावल्याने तुमच्या सुरकुत्या आणि रेषा अधिक दिसतात. ब्लश लावून सुंदर दिसण्यासाठी ते गालाच्या हाडांवर लावा.

आयलायनर :  काळ्या रंगाच्या लाइनरऐवजी गडद तपकिरी रंगाचे लाइनर निवडा.