1950 पर्यंत अर्थसंकल्पाची छपाई राष्ट्रपती भवनमध्ये होत होती. 1980 पासून अर्थसंकलपाची छपाई वित्त मंत्रालयातील मुद्रणालयात होत आहे.

२०१७ पर्यंत देशाचा अर्थसंकलप आणि रेल्वेचा अर्थसंकल्प वेगवेगळा सादर केला जात होता. मात्र, २०१७ पासून दोन्ही अर्थसंकल्प एकत्रिपणे सादर केले जात आहे.

वर्ष 1999 पर्यंत सायंकाळी ५ वाजता लोकसभेत अर्थसंकल्प सादर होत होता. मात्र, 1999 मध्ये एनडीए सरकारने अर्थसंकल्पाची वेळ बदलून सायंकाळी ११ वाजता करण्यात आली.

अर्थमंत्री हीरुभाई मुलजीभाई पटेल यांनी 1977 केवळ 800 शब्दांचे अर्थसंकल्पीय भाषण केले होते. हे आतापर्यंतचे सर्वात छोटे भाषण ठरले आहे

अर्थमंत्री मनमोहन सिंह यांनी 1991 मध्ये केलेले अर्थसंकल्पीय भाषण हे आतापर्यंतचे सर्वात मोठे भाषण ठरले आहे.

यापूर्वी अर्थसंकल्प सादर करताना लाल ब्रीफकेस आणली जात होती. मात्र, २०१९ मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यास देशी लुक देत कापडाची बॅग आणली होती.

मोरारजी देसाई हे सर्वाधिक वेळा 10 देशाचा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री आहेत.

सध्याच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत.

1951 पूर्वी देशात अर्थसंकल्प इंग्रजी भाषेत छापला जात होता. मात्र,1951 पासून तो हिंदी भाषेत छापला जात आहे.

स्वतंत्र भारताच्या पहिल्या अर्थसंकल्पात कराचा कोणताही प्रस्ताव नव्हता. ज्यामध्ये 15 ऑगस्ट 1947 ते 31 मार्च 1948 अवधी समाविष्ट होता.