उन्हाळ्यात पदार्थ फ्रेश राहण्यासाठी फ्रिजचा वापर जास्त प्रमाणात केला जातो.
गरमीमुळे पदार्थ घराब होऊ नये यासाठी फ्रिजमध्ये स्टोअर केले जातात.
मात्र, यामुळे फ्रिजमध्ये दुर्गंधी पसरते, त्याचा उग्र वास येतो.
काहीजण लसूण, कांदा फ्रिजमध्ये ठेवतात,असं केल्याने लसणाला अंकुर फुटतात
कांदा फ्रिजमध्ये लवकरच खराब होतो, त्यामुळे तो बाहेरच ठेवा.
केळं फ्रिजमध्ये ठेवू नका, त्यामुळे त्याची चव, रंग सगळं बदलते.
कॉफी बीन्स बाहेरच घट्ट झाकणाच्या बरणीत ठेवाव्यात.
ऑलिव्ह ऑईल फ्रिजमध्ये ठेवल्यास त्याच्या गुठळ्या तयार होतात.
टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवल्यास त्याची चव बदलते.
मध चुकूनही फ्रिजमध्ये ठेवू नका.
बटाट्यांना फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यांना मोड येतात.
कलिंगड फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यातले अँटीऑक्सिड्ंट्स मरतात, ते बाहेर पाण्यात ठेवा,