नळाचे पाणी थेट बाटलीत भरतात का? जाणून घ्या Bisleri बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया!

Science Technology

23 Nov 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

पाणी कुठून येते?

Bisleri तयार करण्यासाठी पाणी विविध मान्यताप्राप्त स्रोतांमधून गोळा केले जाते. यात भूजल किंवा नागरी पाणीपुरवठ्याचाही समावेश असू शकतो. मात्र, पाणी थेट बाटलीत भरले जात नाही.

Picture Credit:  pinterest

सर्वप्रथम तपासणी

पाणी प्लांटमध्ये आल्यानंतर त्याची प्राथमिक गुणवत्ता तपासली जाते. पाण्यातील अशुद्धता, रासायनिक घटक आणि सूक्ष्मजीवांची तपासणी केली जाते.

Picture Credit:  pinterest

ओझोन प्रक्रिया

पाण्यातील हानिकारक सूक्ष्मजीव कमी करण्यासाठी Ozonisation केले जाते. या प्रक्रियेत ओझोन वायूचा वापर करून पाणी निर्जंतुक केले जाते.

Picture Credit:  pinterest

सँड फिल्टर आणि कार्बन फिल्टर

पाण्यातील वाळू, धूळ आणि इतर घनकण काढण्यासाठी Sand Filtration केले जाते. त्यानंतर Carbon Filtration द्वारे रंग, वास आणि काही अवांछित घटक कमी केले जातात.

Picture Credit:  pinterest

RO मशीनचे काम काय?

यानंतर पाणी Reverse Osmosis म्हणजेच RO प्रक्रियेतून जाते. या तंत्रज्ञानामुळे पाण्यातील विरघळलेले अतिरिक्त क्षार आणि इतर घटक वेगळे केले जातात.

Picture Credit:  pinterest

पाण्यात पुन्हा मिसळतात खनिजे!

RO प्रक्रियेमुळे काही आवश्यक खनिजेही कमी होतात. त्यामुळे पुढील टप्प्यात पाण्यात योग्य प्रमाणात मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसारखी खनिजे मिसळली जातात. या प्रक्रियेला Mineralisation म्हणतात.

Picture Credit:  pinterest

मायक्रॉन फिल्टरेशन आणि पुन्हा ओझोन प्रक्रिया

पाण्यातील अतिसूक्ष्म कण काढण्यासाठी Micron Filtration केले जाते. त्यानंतर Re-Ozonisation करून पाण्याची शुद्धता आणि गुणवत्ता टिकवण्यास मदत केली जाते.

Picture Credit:  pinterest

बाटलीत पाणी कसे भरतात?

पाणी शुद्ध झाल्यानंतर ते स्वच्छ आणि नियंत्रित वातावरणात बाटल्यांमध्ये भरले जाते. Bisleri च्या अनेक बाटल्या प्लांटमध्येच तयार केल्या जातात. त्यानंतर बाटल्यांना झाकण लावून पॅकिंग केले जाते.

Picture Credit:  pinterest

शेवटी होते गुणवत्ता तपासणी!

बाटल्यांवर बॅच नंबर, उत्पादनाची तारीख, वेळ आणि उत्पादन केंद्राची माहिती छापली जाते. Bisleri च्या माहितीनुसार, प्रत्येक बाटली 10 टप्प्यांच्या प्रक्रियेतून आणि 90 गुणवत्ता चाचण्यांमधून जाते.

Picture Credit:  pinterest