नागपंचमीला केली जाते ‘या’ 8 नागांची पूजा

भगवान विष्णूंची भक्ती करणारा शेष नाग पाताळ लोकाचा राजा आहे. याची पूजा नागपंचमीला केली जाते.

वासुकी हा भगवान शंकराच्या गळ्यात असणारा नाग आहे. त्याचीही पूजा केली जाते.

गोमती नदीजवळ पद्म सापांचे राज्य होते, अशी धारणा आहे.नंतर ते आसाम, मणिपूरमध्ये स्थायिक झाल्याचं सांगितलं जातं.

महापद्माचा विष्णुपुराणात उल्लेख आहे. याचीही नागपंचमीला पूजा केली जाते.

कुलिक ही सर्पांची जातही पूजनीय मानली जाते.

शंख साप ही सापांची जात जास्त बुद्धिमान मानली जाते.

कर्कोटक नागाचा पुराणांमध्ये उल्लेख आहे. शिवभक्त असल्याची त्याची ख्याती आहे.

तक्षकाचा उल्लेख महाभारत काळात केला जातो.

आठ नागांसोबत नाग बहीण मनसा देवी  आणि नाग माता कद्रू यांचीही पूजा करण्याची पद्धत आहे.