‘या’ काळ्या फळांमुळे साखरेच्या पातळीवर ठेवता येईल नियंत्रण

मधुमेह असलेल्या व्यक्ती सर्व प्रकारची फळे खाऊ शकत नाहीत. कारण काही फळांमध्ये साखर असते, ज्यामुळे रक्तातील साखर वाढू शकते.

पण काही  काळी फळे अशी आहेत, जी मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहेत.

रक्तातील साखर झपाट्याने कमी करण्यास ही फळे मदत करतात.

जांभळामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेहाच्या रुग्णांसाठी जांभळांचं सेवन फायदेशीर आहे.

काळ्या द्राक्षांमध्ये विशेष संयुगे असतात. त्यामुळे इन्सुलिनचं नियमन आणि इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यास मदत होते.

 ब्लॅक बेरीमध्ये असे विशेष गुणधर्म आहेत, ज्यामुळे साखरेचे ग्लुकोजमध्ये रूपांतर होते आणि पेशींना ऊर्जा मिळते.

ब्लॅकबेरीमध्ये साखरेचं प्रमाण कमी असतं. याशिवाय फायबरचे प्रमाण जास्त असतं.

ब्लॅकबेरीमध्ये साखरेचं प्रमाण कमी आणि फायबरचं प्रमाण जास्त असल्याने शुगर लेव्हल नियंत्रणात राहते.