दम्याच्या रुग्णांची संख्या आजकाल वाढतेय. प्रदुषित हवा आणि धुळीमुळे या रुग्णांचा त्रास वाढतो.

दमा हा फुफ्फुसातील श्‍वास वाहिन्यांशी संबंधित आजार असून, यात श्‍वास सोडायला त्रास जाणवतो. 

फुफ्फुसाच्या आत असलेल्या श्‍वसनवाहिन्यांवर सूज आल्याने त्यांचा व्यास कमी होतो. त्यात स्राव वाढून वाहिन्या आकुंचन पावतात.अशा वेळी श्‍वास सोडताना त्रास होतो.

  आम्ही तुम्हाला अशा काही वनस्पतींबद्दल सांगणार आहोत ज्या हवा स्वच्छ ठेवतात. दमा रुग्णांसाठी या वनस्पती संरक्षण कवच म्हणून काम करतात.

स्पायडर प्लँट दमा आणि ॲलर्जी असलेल्या लोकांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

या वनस्पतीमध्ये हवा शुद्ध करण्याचे गुणधर्म आहेत.

बांबू पाम ही हळूहळू वाढणारी वनस्पती आहे. तुम्ही तुमची लिव्हिंग रूम सजवण्यासाठी देखील हीचा वापर करू शकता.

  नैसर्गिक आर्द्रता वाढवण्याचं कामही हे रोप करतं. त्यामुळे घरातील वातावरणात नेहमीच ताजेपणा राहतो.

स्नेक प्लँट ही एक बारमाही वनस्पती आहे, जी फॉर्मल्डिहाइड, नायट्रोजन ऑक्साईड आणि बेंझिन यांसारखे हवेतील विष शोषून घेते.

घरात ही रोपे लावल्याने वातावरण शुद्ध राहते.

पीस लिली एक सुंदर आणि सदाहरित वनस्पती आहे. त्यात हवेतील विषारी पदार्थ काढून टाकणारे गुणधर्म आहेत.

ही वनस्पती दमा आणि ॲलर्जीच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.