शिवलिंगाची पूजा करताना काही गोष्टी अर्पण करणं टाळलं जातं.

भगवान शंकराच्या पूजेच्या वेळी शिवलिंगावर कुंकू कधीच अर्पण करत नाहीत.

हिंदू स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी कुंकू लावतात. भगवान शिवाचे एक रूप विनाशक मानतात. त्यामुळे शिवलिंगावर कुंकू अर्पण करणं निषिद्ध मानलं जातं.

हिंदू धर्मात हळद शुद्ध आणि पवित्र मानली जाते. 

मात्र शंकराची पूजा करताना हळद वापरली जात नाही.

शिवलिंग हे पुरुष तत्त्वाचे प्रतीक असून हळदीचा संबंध स्त्रियांशी असल्याचं म्हटलं जातं.

यामुळेच शंकराला हळद अर्पण केली जात नाही.

शिवलिंगावर तुळसही अर्पण केली जात नाही.

तसेच शिवलिंगाला शंखाने जल अर्पण केलं जात नाही.