पावसाळ्यात फिरायला जाताना काही गोष्टी तुमच्या सोबत ठे‌वणं आवश्यक आहे.

पावसाळ्यात फिरायला जाताना रेनकोट सोबत असायला हवा. मोठा रेनकोट किंवा पँट आणि शर्ट असा सेट असलेला रेनकोट वापरा.

पावसाळ्यात वॉटर प्रूफ ट्रॅव्हल बॅग घेऊन फिरायला जा किंवा तुमच्या बॅगेसाठी कव्हर सोबत ठेवा म्हणजे बॅगेतलं सामान भिजणार नाही.

पावसाळ्यात फिरताना थोडे शॉर्ट कपडे किंवा लवकर वाळतील असे कपडे वापरा.

कारण ओल्या कपड्यांमध्ये जास्त वेळ वावरल्याने आजारपण ओढवू शकतं.

पावसाळ्यात चिखलात चालताना त्रास होणार नाही, असे शूज वापरा. एक एक्स्ट्रा शूजची जोडी सोबत ठेवा.

मच्छरपासून वाचण्यासाठी कॉईल आणि क्रीमही सोबत ठेवा.

मोबाईल चार्जर तर सोबत ठेवाच पण पॉवर बँक घ्यायला विसरू नका. 

तुम्हाला कोणता आजार असेल तर त्याच्या गोळ्या सोबत ठेवा. भिजल्यामुळे सर्दी, खोकला किंवा ताप येणं असं काही होत असल्यास ती औषधंदेखील सोबत ठेवा.