www.navarashtra.com

Published Jan 23,  2025

By Mayur Navle

सोलो ट्रिपवर असताना या गोष्टी स्वतःजवळ बाळगाच

Pic Credit -  iStock

एकटण्याने फिरण्याचे स्वप्न अनेकांचे असते. पण एकटे फिरताना काही महत्वाच्या गोष्टी तुमच्या जवळ असणे गरजेचे आहे. 

सोलो ट्रिप 

आधार कार्ड, पासपोर्ट, आणि ट्रिपसाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे डिजिटल स्वरूपात सेव्ह करून ठेवा.

महत्त्वाची कागदपत्रे

जवळच्या व्यक्तींचे संपर्क क्रमांक लिहून ठेवा, तसेच मोबाईलमध्ये सेव्ह करा. 

आपत्कालीन संपर्कांची यादी

काही ठिकाणी ऑनलाइन पेमेंट किंवा एटीएमची सुविधा नसते, त्यामुळे नकद ठेवणे महत्त्वाचे आहे.

स्वतःजवळ कॅश ठेवा

पहिल्या उपचारासाठी औषधांचा किट सोबत ठेवा. त्यात बँडेज, पेनकिलर्स, डायरिया आणि अलर्जीची औषधे असावीत.

मेडिकल किट

प्रवासादरम्यान पिण्याचे पाणी आणि हलकी स्नॅक्स ठेवणे आवश्यक आहे, विशेषतः दुर्गम ठिकाणी जाताना.

पाणी आणि स्नॅक्स

मोबाईल व इतर डिव्हाइस चार्ज करण्यासाठी पॉवर बँक सोबत ठेवा, कारण काही ठिकाणी विजेची सुविधा  मिळेलच असे नाही.

पॉवर बँक व चार्जिंग उपकरणे

इंटरनेट नसल्यास वापरण्यासाठी ठराविक भागाचा ऑफलाइन मॅप  डाउनलोड करून ठेवा.

ऑफलाइन गूगल मॅप्स