घराभोवती झाडे लावणे शुभ असते. जाणून घेऊया घरात कोणत्या दिशेला झाडे लावावीत
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये झाडे लावल्याने सकारात्मक ऊर्जा कायम राहते.
घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला दाट झाडे लावावीत. मात्र, भिंतीजवळ लावू नयेत
घराच्या उत्तर-पूर्व दिशेला झाडे लावणे टाळावे. या दिशेने झाडे लावली तर ती लहान ठेवा.
फुलांची रोपे अनेकांना लावायला आवडतात. ती नेहमी घराच्या पूर्व दिशेला लावावी
घराच्या पश्चिम-उत्तर दिशेला हळद, सुपारी, चंदनाची झाडे लावावीत. कुटुंबात प्रेम वाढते.
लिंबू, निवडुंगासारखी काटेरी झाडे घरामध्ये लावू नयेत.
गुलाबाचं झाड घरात लावू शकता. मात्र, काळ्या गुलाबाचं झाडं लावू नये.