भारतातील ही सुंदर ठिकाणे जिथे जेवण मिळतंय अगदी मोफत...
ईशा फाउंडेशन
ईशा फाउंडेशन कोईम्बतूरपासून ४० किमी अंतरावर आहे. येथे आदियोगी शिवाची अतिशय सुंदर मोठी मूर्ती आहे, येथे तुम्ही विनामूल्य राहू शकता.
मणिकरण साहिब गुरुद्वारा
जर तुम्ही सुंदर हिमाचल प्रदेशला भेट देणार असाल, तर तुम्ही मणिकरण साहिब गुरुद्वारामध्ये विनामूल्य राहू शकता.
आनंदाश्रम
केरळच्या सुंदर टेकड्या आणि हिरवाईमध्ये तुम्ही आनंदाश्रममध्ये विनामूल्य राहू शकता. दिवसातून तीन वेळचे जेवणही येथे दिले जाते.
गीता भवन
पवित्र गंगा नदीच्या काठी वसलेल्या गीता भवनमध्ये प्रवासी विनामूल्य राहू शकतात. येथे तुम्हाला मोफत जेवणही दिले जाते.
गोविंद घाट गुरूद्वारा
हा गुरुद्वारा उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात आहे. येथे येणारे पर्यटक, ट्रेकर्स आणि भाविक या ठिकाणी मोफत
राहू शकतात.
न्यिंगमापा मोनेस्ट्री
हा मठ हिमाचल शहरातील रेवलसर येथे आहे. या सुंदर मठात राहण्यासाठी एका दिवसाचे भाडे 200 ते 300 रुपये आहे.
तिबेटी बौद्धिस्ट मोनेस्ट्री
युपीमध्ये एक ऐतिहासिक मठ आहे, येथे एका रात्रीच्या मुक्कामाचे भाडे फक्त 50 रुपये आहे. मठात भगवान बुद्धांचे एक रूप असलेल्या शाक्यमुनींची मूर्ती आहे.