Nothing Phone 2 ची विक्री आता सुरु झाली आहे.
हा स्मार्टफोन विक्रीसाठी Flipkart वर उपलब्ध आहे.
हा फोन जर तुम्ही ॲक्सिस बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केला तर तुम्हाला तीन हजार रुपयांचा डिस्काउंट मिळेल.
या स्मार्टफोनला Snapdragon 8+ Gen 1 चिपसेटचा सपोर्ट आहे.
हा फोन तीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. बेस व्हेरिएंट फोन 8GB रॅम + 128GB स्टोरेज सह 44,999 रुपये किमतीचा आहे.
12GB रॅम + 256GB स्टोरेजसह मिड व्हेरिएंटची किंमत 49,999 रुपये आणि 12GB रॅम + 512GB स्टोरेजसह टॉप एंड व्हेरिएंटची किंमत 54,999 रुपये आहे.
Nothing Phone 2 च्या सेलमध्ये स्मार्टफोन सोबतच महागडे Nothing प्रोडक्ट्स फ्रीमध्ये मिळणार आहेत.
या फोनमध्ये ड्युएल रियर कॅमेरा असून 50MP Sony IMX890 प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे.
सेल्फी आणि व्हिडिओसाठी 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.
अँड्रॉइड 14 आधारित NothingOS 2.0 वर हा फोन चालतो. यात 4,700 mAh क्षमतेची बॅटरी आणि 45 W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.