महाराष्ट्रातील राजकीय संघर्षाची सध्या सगळीकडेच चर्चा सुरू आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील सुंदर जंगल म्हणून ओळखले जाते.
ताडोबा तलाव आणि पांढरपौनी तलाव म्हणजे ताडोबा जंगलाची राजधानी
या तलावावर अधिकार असणारा जंगलाचा राजा असतो आणि राजा म्हटलं की राणी आलीच
ताडोबा जंगलाची राणी माया वाघीण आहे.
मात्र, या माया वाघिणीला मिळवण्यासाठी, जंगलावर राज्य करण्यासाठी वाघांमध्ये संघर्ष होतो. जिंकणारा राजा होतो
ताडोबात मटकासूर, बजरंग,ताला, रुद्र, बलराम, मोगली हे वाघ अधिकार गाजवण्यासाठी फाईट करतात.
सत्तासंघर्षात जिंकणाराच राजा बनतो, सध्या मोगली या जंगलाचा राजा आहे.
बलरामला हरवून मोगली जंगलाचा राजा झालेला आहे.
सत्ता टिकवायची असेल तर प्रत्येक वेळी जिंकावेच लागेल.