मुळा खाताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

मुळ्यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, ‘क’ व ‘ब’ जीवनसत्त्वे, आर्द्रता, प्रथिने, मेद, खनिजे, तंतुमय आणि पिष्टमय पदार्थ हे सगळे घटक असतात.

मुळा चवीला थोडा तिखट आणि किंचित गोड व जिभेला चरचरणारा असतो.

लाल आणि पांढरा अशा दोन प्रकारात मुळा मिळतो. 

 जेवताना चांगली भूक लागण्यासाठी व घेतलेला आहार पचण्यासाठी मुळ्याच्या चकत्या करून जेवणाबरोबर कच्च्या खाव्यात.

रिकाम्या पोटी मुळा खाऊ नका. त्यामुळे छातीत व पोटात जळजळ सुरू होते.

पित्तप्रकृती असणाऱ्या व्यक्तींनी मुळा जपूनच खावा. पित्ताचा त्रास होऊ शकतो.

वर्षभर मुळा खाता यावा म्हणून मुळ्याचे रायते, लोणचे करून ठेऊ शकता.

ताज्या मुळ्याचा पराठा, चटणी, कोशिंबीर, थालीपीठ  असंही बनवून खाऊ शकता.