कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवण्यासाठी करा 'हे' उपाय
दरवर्षी 29 सप्टेंबरला जागतिक हृदय दिन साजरा केला जातो.
जागतिक ह्रदय दिनाच्या निमित्ताने कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठीचे काही उपाय आपण जाणून घेऊयात.
कोलेस्ट्रॉल पातळ्यांवर देखरेख ठेवण्यासाठी आणि हृदयाचे आरोग्य तपासण्यासाठी वेळीच डॉक्टरांकडे तपासणी करा.
योग्य डॉक्टरांचा सल्ला आणि आरोग्याबाबत माहिती मिळाल्याने कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवता येईल.
हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी रोज व्यायाम करणं आवश्यक आहे.
फायबर आणि पौष्टिक घटक असणारा आहार घ्या. यामुळे एलडीएल (बॅड) कोलेस्ट्रॉल कमी होईल.
वजन नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करा. वजन जास्त असल्यामुळेही कोलेस्ट्रॉल वाढतं.
धूम्रपान आणि मद्यपानामुळेही कोलेस्ट्रॉल वाढतं.त्यामुळे ते टाळा.