लहान मुलांना वाचनाची सवय कशी लावावी ? हा प्रश्न पालकांना पडलेला असतो.
लहान मुलांना वाचनाची आवड लावण्यासाठी काही टिप्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मुलांना जे विषय आवडतात त्या विषयांपासून सुरुवात करा.
अशी वेळ निवडा जेव्हा शांतपणे वाचन करता येईल.
आधी 5 मिनिटांनी सुरुवात करा. हळुहळू वाचनाची वेळ वाढवा.
वाचनाचे काही ग्रुप्स असतील तर त्यात मुलांना सामील करा.
इतर वाचन करणाऱ्या मुलांना बघून लहान मुलांना वाचनाची इच्छा निर्माण होईल.
वाचन आनंददायी आणि मजेदार करण्याचे मार्ग शोधा.
टीव्ही, फोन, कॉम्प्युटरमुळे वाचनाकडे दुर्लक्ष होऊ शकतं. त्यामुळे या सगळ्यापासून लांब बसून वाचन करायला लावा.