चांदीच्या दागिन्यांवरील काळेपण दूर करण्यासाठी जाणून घ्या टिप्स 

Life style

01 December, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

चांदीचे दागिन्यांनी देखील रॉयल आणि आकर्षक लुक दिसतो. मात्र नंतर त्यावर काळेपणा येतो. असे घरगुती उपाय करून तुम्ही त्याची चमक परत आणू शकता. 

चांदीची चमक 

बेकिंग सोडा पाण्यामध्ये मिसळून त्यामध्ये दहा ते पंधरा मिनिटं चांदीचे दागिने ठेवा. त्यानंतर मऊ कपड्याने किंवा ब्रशने ते घासून घ्या. त्यामुळे दागिन्याचे काळे पण दूर करते आणि त्याची चमक परत आणते

बेकिंग सोडा आणि पाणी 

टूथपेस्टचा वापर 

पांढऱ्या रंगाची टूथपेस्ट देखील चांदीचे दागिने फायदेशीर आहेत. दागिन्यांना टूथपेस्ट लावल्यावर मऊ ब्रशने हलक्या हाताने घासा. त्यानंतर दागिने पाण्याने धुवून ते सुकवा.

लिंबू आणि मीठ 

लिंबूचा रस घेऊन त्यामध्ये मीठ मिसळा. याची पेस्ट दागिन्यांवर लावा. ते फक्त काळेपणा दूर करत नाही तर दागिन्यांची चमक आणि नवीन असल्यासारखे दिसतात 

पांढरे विनेगर 

थोडे पांढरे विनेगर घ्या आणि त्यामध्ये चांदीचे दागिने दहा मिनिटे भिजवून ठेवा. विनेगर काळेपणा हटवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. 

ॲल्युमिनियम फॉइल 

एका भांड्यात गरम पाणी, बेकिंग सोडा आणि एक तुकडा ॲल्युमिनियम फॉइल टाका. या म्हणजे चांदीचे दागिने पाच ते दहा मिनिटे भिजवा. 

केमिकल क्लिनर 

बाजारामध्ये चांदीसाठी स्पेशल क्लीनर उपलब्ध आहे. याचा वापर करण्यापूर्वी लेबल वाचून घ्या आणि सुरक्षिततेचे नियम पाळा. हा उपायच्या दागिन्यांसाठी उपयुक्त आहे त्या दागिन्यांवर आकर्षक डिजाइन आणि खडे असतात

नियमित स्वच्छता

दागिने पर्यटन करून झाल्यानंतर ते मऊ कपड्यांनी पुसायचे विसरू नका. चांदीला हवा, घाम आणि रासायनिक पदार्थांपासून दूर रहा. यांचे नियमितपणे काळजी घेतल्यास त्याच्यावर कधीही काळेपणा येणार नाही.