कीबोर्डपेक्षा काहीतरी वेगळं! Logitech MX Keypad का चर्चेत आहे?

Science Technology

17 Oct 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

हे पारंपरिक कीबोर्डसारखं टायपिंग करण्यासाठी नाही. Logitech MX Keypad हे कस्टमाइजेबल कंट्रोल पॅड असून, वारंवार वापरल्या जाणाऱ्या कमांड्स एका टचवर सुरू करण्यासाठी डिझाइन करण्यात आलं आहे.

साधं कीपॅड नाही!

Picture Credit:amazon

यातील LCD कीजवर वेगवेगळी चिन्हं दिसतात. गरजेनुसार त्यांना विशिष्ट कामं किंवा शॉर्टकट्स देता येतात. त्यामुळे वारंवार मेन्यू शोधण्याचा वेळ वाचू शकतो.

प्रत्येक कीचं काम वेगळं!

Picture Credit:amazon

GitHub Copilot, Claude Code आणि OpenAI Codex यांसारख्या टूल्ससाठी प्रॉम्प्ट्स, AI एजंट्स आणि कमांड्स सुरू करता येतात. यासाठी संबंधित AI सेवांचं अकाउंट आणि इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे.

AI कमांड्स एका टचवर!

Picture Credit:amazon

VS Code आणि IntelliJ वापरणाऱ्यांना कोड नेव्हिगेशन, टर्मिनल सुरू करणं आणि डिबगिंगसारख्या कामांसाठी झटपट कंट्रोल्स मिळतात. त्यामुळे वारंवार मेन्यू किंवा शॉर्टकट शोधण्याची गरज कमी होऊ शकते.

कोडिंगसाठी खास कंट्रोल्स

Picture Credit:amazon

MX Keypad अ‍ॅक्टिव्ह अ‍ॅपनुसार कीजचे कंट्रोल्स बदलू शकतो. Figma, Zoom, Slack, Spotify आणि Adobe Creative Cloud यांसारख्या अ‍ॅप्सवर काम करताना हे फीचर उपयोगी ठरू शकतं.

अ‍ॅप बदलताच कीजही बदलतात!

Picture Credit:amazon

Logi Options+ सॉफ्टवेअरच्या मदतीने कीज कस्टमाइझ करता येतात. अनेक प्लगइन्समध्ये तयार प्रोफाइल्सही मिळतात. त्यामुळे सुरुवातीपासून प्रत्येक कमांड सेट करण्याची गरज नसते.

स्वतःच्या गरजेनुसार सेटिंग

Picture Credit:amazon

भारतात Logitech MX Keypad ची लॉन्च किंमत ₹15,999 होती. हे गॅजेट नियमितपणे AI टूल्स आणि कोडिंग कमांड्स वापरणाऱ्या प्रोफेशनल्ससाठी अधिक उपयुक्त ठरू शकतं.

किंमत किती आहे?

Picture Credit:amazon

डेव्हलपर्स, AI टूल्स वापरणारे आणि अनेक अ‍ॅप्सवर काम करणाऱ्यांसाठी हे अतिरिक्त कंट्रोल पॅड फायदेशीर ठरू शकतं. मात्र, सामान्य टायपिंगसाठी वेगळं कीपॅड घेण्याची गरज नाही. तुमच्या कामात वारंवार कमांड्स वापरल्या जात असतील, तरच याचा अधिक फायदा होईल.

प्रत्येकासाठी आवश्यक आहे का?

Picture Credit:amazon